भाजपा हमसे डरती है... ईडी-सीबीआय को आगे करती है...

भाजपा हमसे डरती है... ईडी-सीबीआय को आगे करती है...

महाविकास आघाडीची जोरदार घोषणाबाजी, मलिकांवरील कारवाईचा निषेध


। अहमदनगर । दि.28 फेब्रुवारी । भाजपा हमसे डरती है.. ईडी-सीबीआय को आगे करती है... ईडी झाली येडी...सत्य परेशान.. ईडीचा गैरवापर करणार्‍या केंद्र सरकारचा निषेध असो... अशा जोरदार घोषणा देत व तसे फलक झळकावत नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीने शनिवारी भाजपचा निषेध केला. मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त करताना, केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय...अशी घोषणाबाजी यावेळी रंगली.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी जुन्या बसस्थानकाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह ना. आशुतोष काळे, डॉ. सुधीर तांबे, संग्राम जगताप, निलेश लंके, डॉ. किरण लहामटे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, दीप चव्हाण, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते. 

मंत्री बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख, तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे, विधान परिषदेचे माजी आ. अरुण जगताप, कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार, श्रीरामपूरचे आ. लहु कानडे आदी अनुपस्थित होते.

त्यांचे उद्योग समोर आणणार
भारतीय जनता पार्टी सरकारने मागील पाच वर्षांमध्ये जे उद्योग केलेत, हे सुद्धा जनतेसमोर आले पाहिजेत. महावितरणला कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नका, असे लेखी आदेश केंद्र सरकारने काढले आहेत. एक प्रकारे महाराष्ट्राला या खात्यामार्फत पुन्हा एकदा बदनाम करण्याचा प्रकार केंद्राने चालू केला आहे. हे सुद्धा आता आता जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मंत्री तनपुरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post