। कोपरगाव । दि.28 फेब्रुवारी । शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व विज्ञानगर भागातील रहिवाशी दिलीप भीमराव धुमाळ यांच्या पत्नी रजनी दिलीप धुमाळ यांचे गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
या दुःखद घटनेचा धुमाळ कुटुंबियांवार आघात झाला. या घटनेस काही तास होत नाहीत ताेच मृत रजनी धुमाळ यांचे पती दिलीप भीमराव धुमाळ यांचे शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
दिलीप धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते उमेश धुमाळ यांचे चुलत बंधू, तर सेवानिवृत्त पाणीपुरवठा अधिकारी विश्वास धुमाळ यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातू असा परिवार आहे.
Tags:
Ahmednagar