। सोलापूर । दि.09 फेब्रुवारी । कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली, ती भरून निघाली पाहिजेत. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम आयोजित केला होता. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 44 शाळांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयात प्रथम आलेल्या दोन शाळांचा मंत्रालयात सन्मान करण्यात आला
तर उर्वरीत शाळांना सोलापूरच्या जिल्हा परिषदेत सन्मानित करण्यात आले. आजच बोर्डाने बारावीच्या परीक्षांबाबत आणि हॉलतिकीटबाबत मोठी अपडेट दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहे.
परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळा शनिवार रविवार सुरू राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Tags:
Breaking