अभिनेत्री माही गिल आणि अभिनेता हॉबी धालीवाल भाजपात दाखल


। पंजाब । दि.09 फेब्रुवारी । पंजाबमध्ये भाजपला कलाकारांची साथ मिळाली आहे. अभिनेत्री माही गिल आणि अभिनेता हॉबी धालीवाल यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंदीगडमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी या दोघांचे पक्षात स्वागत केले. माही गिल या मूळच्या धमोट येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल पंजाब सरकारचे उप आर्थिक सल्लागार राहिले आहेत.

कमलजीत सिंह उर्फ हॉबी धालीवाल हे मलेरकोटला येथील असून सध्या पतियाळा येथे त्यांचे वास्तव्य आहे. पंजाबी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे.

आज मी एका नव्या मार्गावर चालणार आहे. पूर्ण मनाने पक्षाचे काम करण्याची माझी इच्छा आहे. 6 वर्षांपूर्वी एखाद्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा होती. मुलींसाठी पंजाबमध्ये बरेच काही करू इच्छिते. आज मला एक उत्तम व्यासपीठ मिळाला आहे. आमचा पक्ष केंद्रात सत्तेवर असल्याचे माही यांनी म्हटले आहे.

पंजाबवर माझे अत्यंत प्रेम आहे. 1947 पासून पंजाबमध्ये कधीच भाजपच्या विचारसरणीबद्दल चर्चा झालेली नाही. भाजपचा विचार पंजाबमध्ये पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकांना जागरुक करून त्यांचा आवाज भाजपच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे धालीवाल म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post