। नवी दिल्ली । दि.28 फेबु्रवारी । रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे सोमवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याच्या दरात 800 रूपयांनी जोरदार वाढ झाली आहे.
चांदीचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून म्हणजेच 1,000 रूपयांनी वाढून चांदीचा दर 65,869 रुपये प्रति किलो झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत फेब्रुवारीमध्येच 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच्या किंमती एका वर्षाच्या उच्चांकावर दिसत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव असाच सुरु राहिला तर सोन्या-चांदीच्या किंमती वाढतच जातील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Tags:
Maharashtra