पीएफवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता

 

 देशातील २४ कोटी EPFO खाते धारकांना मोदी सरकार मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर EPFO व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की EPFO ​​च्या CBT ची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे. त्यात 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याच्या प्रस्ताव आहे. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) पुढील महिन्यात मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत 2021-22 साठी PF ठेवींवरील व्याजदरांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. बैठकीत 2021-22 साठी पीएफ ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post