। मुंबई । दि.15 फेब्रुवारी । शिवसेना आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय संघर्षाचा पुढील अंक आज रंगण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त वाढवायला सुरुवात झाली आहे. पोलिस अधिकारी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी दाखल होत तयारीचा आढावा घेत आहे.
शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. दुपारपासून शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी आज शिवसेना भवनात दाखल होणार आहेत.
Tags:
Breaking