नगरमध्ये पाणीपुरवठा झाला विस्कळीत


। अहमदनगर । दि.21 जानेवारी । नगर शहराच्या पाणी योजनेची वीज पुन्हा खंडीत झाली व ती पुन्हा सुरू झाल्यावर पुन्हा ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाल्याने नगर शहरात शुक्रवारी पाण्याचा ठणठणाट होता. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

हे देखील वाचा...येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी

दि.20 रोजी सायंकाळी शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने शुक्रवारी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगराचादेखील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी सायंकाळी 5.45 ते 6 या वेळेत वीज वितरण कंपनीकडून शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

हे देखील वाचा...प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी सई समीर सुकाळे याची निवड  

तो नंतर सुरु झाल्यानंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरु करीत असताना विळद पंपींग स्टेशन येथील सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्याचे युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण होत असताना पहाटेच्या सुमारास तेथील 2500 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे देखील वाचा...कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड 

परिणामी, गुरूवारी सायंकाळी स्टेशन रोड भागास पाणी पुरवठा होवू शकला नाही. तसेच शुक्रवारी सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चौक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर आदी भागासह सर्व उपनगर भागातील पाणी पुरवठा बंद राहिला आहे. 

हे देखील वाचा...श्री साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा 

दरम्यान, मंगलगेट, रामचंद्रखूंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळु बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहोर रोड, प्रोफसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युन्सिपल हडको, सावेडी, सारसनगर, बुरूडगाव रोड या भागास शनिवारऐवजी रविवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

हे देखील वाचा...कर्जत नगरपंचायतवर पवारांचे वर्चस्व 

1 Comments

  1. पाणी येणार कधी ते कोण सांगनार

    ReplyDelete
Previous Post Next Post