प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी सई समीर सुकाळे याची निवड


। अहमदनगर । दि.21 जानेवारी । कोपरगाव येथील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बाबुराव गवारे यांची पणती व शरद गवारे यांची नात व सध्या पुणे येथे कावेरी कॉलेज एसवाय बीएला असलेली विद्यार्थिनी सई समीर सुकाळेची २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली. 

हे देखील वाचा...येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी 

सई सुकाळे हिने वयाच्या चौदाव्या वर्षी लहान वयात दक्षिण आफ्रिकेत अटलांटिक महासागरातील सहा मार्ग एका महिन्यात पोहून विक्रमाची नोंद केली होती. त्यात तिला दोन सुवर्ण, दोन सिल्वर, दोन ब्रांझ पदके मिळाली होती. सर्वात कमी वयात तिने नोंदवलेल्या विक्रमाबद्दल कॅप लोक डिस्टन्स स्विमिंग असोसिएशनने तिचा गौरव केला होता.

हे देखील वाचा...कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड 

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सईचे धाडस पाहून तिच्या सागरी मोहिमेस मुख्यमंत्री निधीतून सात लाख रुपये मदत देऊ केली होती. सईचे वडील समीर यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे, तर आई सुवर्ण या स्वतः ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहेत. 

हे देखील वाचा...आज 448 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर 

जलतरण स्पर्धेत सई सुकाळे हिने या आधी इंटरनॅशनल ओपन वॉटर्स स्विमर साऊथ आफ्रिका लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर व नॅशनल स्विमर म्हणून नाव कमावले. सई येत्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे, असे तिची आई सुवर्णा सुकाळे यांनी सांगितले.

हे देखील वाचा...श्री साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

Post a Comment

Previous Post Next Post