मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत : धर्मादाय उपआयुक्त
| अहिल्यानगर | दि.11 ऑगस्ट 2025 | दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करताना वर्गणी गोळा करण्यासाठी अधिनियम १९५० च्या कलम ४१ क अन्वये परवानगी घेणे सदर कायद्याने बंधनकारक असून परवानगी शिवाय वर्गणी गोळा करणे बेकायदेशीर आहे. मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन धर्मादाय उपआयुक्त, अहिल्यानगर यांनी केले आहे.
वर्गणी गोळा करताना संबधीत व्यक्तीस वर्गणी मिळाल्याची पावती देण्यात यावी. पावतीवर धर्मादाय कार्यालयाने दिलेल्या परवानगीचा क्रंमाक नमूद करणे बंधनकारक आहे. परवानगीसाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज व अपलोड केलेली कागदपत्राची प्रत धर्मादाय उपायुक्त कार्यालयात सादर करावी. अर्जाच्या छाननीनंतर मंडळास परवानगी देण्यात येईल. परवनगी देण्यात आलेल्या मंडळांनी उत्सव संपल्यानंतर दोन महिन्यात त्याबाबतचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग