। अहमदनगर । दि.19 जानेवारी । येथील मालन माधवराव गाडे (वय 87) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर आणि उदयोजक रमाकांत गाडे यांच्या त्या मातोश्री होत. जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष जेष्ठ उद्योजक चंद्रकांत गाडे यांच्या त्या चुलती होत.
तर शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांच्या त्या आजी होत. येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar