। अहमदनगर । दि.21 जानेवारी । राहुरी तालुक्यात अनधिकृत गौणखनिज उत्खनन करून वाहतूक केलेबाबत जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राहुरी तहसील कार्यालयाने दिली.
या वाहन मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केली नसल्याने त्यांच्या जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करुन लिलावातून प्राप्त होणारा महसूल शासना जमा करणे आवश्यक असल्याने ही वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना नं. 3 नुसार अटकावून ठेवण्यात आली आहेत.
अटकावून ठेवण्यात आलेल्या या वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त झाले आहे व या मूल्यांकनानुसार उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुरी यांच्याकडून लिलाव करण्यास मंजुरी दिली गेली आहे.
या पार्श्वभूमीवर, विक्रीकरीता यामध्ये निश्चित केलेल्या तारखेपूर्वी देय रक्कम शासन जमा केली नाही तर 21 जानेवारी 2022 रोजी तहसील कार्यालय, राहुरी येथे सकाळी 11 वाजता जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणा आहे.
लिलावात भाग घेऊ इच्छिणार्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणार्या जंगम मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम, कोणत्या वाहनांचा लिलाव करावयाचा आहे तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरीता तहसिलदार, राहुरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Tags:
Ahmednagar