महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार...


। मुंबई । दि.31 जानेवारी 2026 । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला, यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी अजित पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post