आरोग्यमंत्री टोपेंवर गुन्हा दाखल करा : प्रविण दरेकर

आरोग्यमंत्री टोपेंवर गुन्हा दाखल करा : प्रविण दरेकर

दबावाखाली पोलिसांकडून कर्मचार्‍यांवर कारवाई


 । अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर । जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीला जबाबदार धरून आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पोलिसांनी दबावाखाली फक्त कर्मचार्‍यांवर कारवाई केली का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील फायर ऑडिटेरबाबत 337 रुग्णालयाचे अंदाजपत्रक पाठवले असताना अद्याप एकही रुग्णालयाचे काम सुरू नाही. आगीच्या संदर्भात एक खिडकी योजना असावी तरच लवकरात लवकर कामे होतील प्रस्तवा या विभागाकडून त्या विभागाकडे जातो आणि कामे खोळंबतात. जिल्हा रुग्णालयात सध्या आयसीयु बंद असून तो तातडीने सुरू करावा.

जिल्हा नियोजन समितीकडे यासंदर्भातील जे काही प्रस्ताव असतील ते लवकरात लवकर मंजूर करावे अशी विनंती मी पालकमंत्र्यांना करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली, तसेच सुरु असलेल्या परिचारिका आंदोलनास भेट देऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पोलीसांनी परिचरिकाना या घटनेबाबत दोषी धरून गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत आम्ही सरकारला जाब विचार असल्याचे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी परिचारिकांना दिले आहे.

यावेळी माजीमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, जिल्हा संघटक अ‍ॅड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, मनेष साठे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह शहर, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान दरेकर यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला पाठीबा दिला.

विचारल्यावर ते फक्त हसले....
नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये फायर यंत्रणा बसवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून अडीच कोटी रुपये मंजूर केले असले तरी तो निधी उपलब्ध नाही. शिवाय, यासंदर्भातील फायलीवर सहीही झालेली नाही. ती सही का थांबली, असे विचारले असता, उपस्थित सारे अधिकारी हसले, असा दावा करुन दरेकर म्हणाले, पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने फायलीवर सही करावी व सिव्हलचा आयुसीयु कक्षही तातडीने सुरु करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पवार, आधी रुग्णालय सुरु करा
आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारने व्हेंटिलेटर जे दिले आहे, ते निकृष्ट आहेत व त्याच्यातून हा प्रकार घडला, असा आरोप केला, यावर विचारले असता दरेकर म्हणाले की, फक्त त्यांना आरोप करायचे एवढेच माहीत नाही. अगोदर त्यांनी या ठिकाणचा दवाखाना पुन्हा सुरु करुन दाखवावा, असे आव्हान देऊन ते म्हणाले, एवढी घटना होऊन देखील सुध्दा जिल्हा रुग्णालयांमध्ये कोणत्याही वैद्यकीय सुविधा पुन्हा सुरु झालेल्या नाहीत, येथे आयीसीयु सेंटरसुध्दा सुरु झालेले नाही. आता ते दोन दिवसात सुरु करण्याची ग्वाही मला प्रशानाने दिली आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post