पेट्रोल, डीझेल स्वस्त करा : आमदार बबनराव पाचपुते
। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर । केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल कर कमी करून जनतेला जो न्याय दिला, तोच न्याय राज्य सरकारने द्यावा, या मागणीसाठी आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. ते निवेदन प्रातिनिधिक स्वरुपात श्रीगोंदा नायब तहसीलदार ढोले यांच्याकडे देण्यात आले.
पाचपुते म्हणाले, राज्यात डिझेलवर 24 टक्के आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.
सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणार्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी.
संदीप नागवडे म्हणाले की, मोदी सरकारने ज्या प्रकारे कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा. यावेळी बाळासाहेब महाडिक,
गटनेते गोरे, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, राजेंद्र उकांडे, नगरसेवक सुनील वाळके, दिपक हिरणावळे, अंबादास औटी, उमेश बोरुडे, बाळासाहेब गांधी, काका कदम, आदेश शेंडगे, अमोल अनभुले, महेश क्षीरसागर, अदित्य अनवणे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.