अण्णा हजारे यांचा एसटी कर्मचार्यांच्या मागण्याना पाठींबा
लवकरच मागण्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना अण्णा हजारे भेटणार
। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर । राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरु आहे. यावर भाष्य करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या मागण्या वर सरकारने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावाला पाहिजे तसेच सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर विचार होणे गरजेचे असून या संदर्भात लवकरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मुख्यमंत्र्याना या संदर्भात भेटणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची एसटी कर्मचारी आंदोलनकर्त्यांच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदीप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचार्यांनी पुकारलेला बंद नंतर आता एसटी कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची राळेगण येथे जावून भेट घतली व त्यांच्या मागण्याचे निवदन हजारे यांना दिले.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, सरकार आणि एसटी आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, 38 एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या करुनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव अणण्याशिवाय पर्याय नाही, कर्मचार्यानी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहितेच्या मार्गाने केले पाहिजे, असे ही ते यावेळी म्हणाले.
Tags:
Breaking