नगरची प्रणिता सोमण राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेची महाराष्ट्राची कर्णधार

नगरची प्रणिता सोमण राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेची महाराष्ट्राची कर्णधार

नगरच्या सात खेळाडूंचा महाराष्ट्र संघात समावेश

। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर ।  हरणाया येथे 25 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार्‍या 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपटू नगरची प्रणिता सोमण करणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप जाधव व सचिव प्रा.संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांनी जाहीर केला. यात प्रणिता सोमणची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

हे देखील वाचा...भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकाला धडकली

तसेच या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नगरचे संकल्प थोरात, अपुर्वा गोरे, अपर्णा गोरे, सिद्धात पिडीयार, ओम करांडे, प्रणव धामणे या खेळाडूंचीही विविध गटामध्ये निवड करण्यात आली आहे. नगरच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवत 

हे देखील वाचा...कंपनीच्या इंजिनियरला कामगाराची बेदम मारहाण 

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंना प्रा. संजय साठे, प्रा.संजय धोपावकर, प्रा.साईनाथ थोरात आदिंचे मार्गदर्शन लाभले आहे. हे सर्व खेळाडू  पेमराज सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. नगरच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवडीबद्दल क्रिडाक्षेत्रातील अनेकांनी खेळाडू  व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा...एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ

महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राजेंद्र सोनी, प्रशिक्षक बिरु भोजने, सहप्रशिक्षक व व्यवस्थापक पांडूरंग भोजने, मेकॅनिक व्यवस्थापक केशव शिंदे काम पाहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post