जिल्हा रुग्णालयातील मृतांना मेणबत्त्या लावून वाहिली श्रद्धांजली ; परिचारिका व डॉक्टर्स यांनी व्यक्त केली संवेदना

। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सहा नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागात अचानक आग लागून व धुरामुळे उपचार घेत असलेल्या 11 कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या मृत्यूबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्दैवी घटनेतील सर्व मृत रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नुकताच जिल्हा रुग्णालय ते लाल टाकी चौकापर्यंत एक कॅण्डल मार्च काढण्यात आला.

तिघांनी एकास मारहाण करून लुटले

परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी या सर्वांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, परिचारिका व डॉक्टर्स रुग्णसेवेत अखंड कार्यरत असतात. कोणत्याही रुग्णाला लवकर बरे वाटावे यासाठी त्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेतात. मात्र दुर्दैवाने जी घटना झाली, त्याबद्दल आम्हाला प्रचंड दुःख आहे. आम्ही रुग्णांबद्दल अतिसंवेदनशील आणि कार्यरत असताना शासनाने दुसरीकडे आमची बाजू न तपासता चुकीच्या पद्धतीने काही परिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, आम्ही याविरुद्ध असलेला लढा स्वतंत्रपणे लढू. 

डेहराडूनमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! 

मात्र, ज्या रुग्णांचा या घटनेमध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला, त्यांच्याप्रती आमच्या संवेदना आजही जागृत आहेत, असे त्या म्हणाल्या. वास्तविक, ही लागलेली आग कशामुळे लागली, याला नेमके कोण जबाबदार याबाबत तो तपासाचा भाग आहे. पण परिचारिका याला जबाबदार नाहीत. वरिष्ठांनी घेतलेले निर्णय, त्यांनी यामध्ये केलेले एकंदरीत काम हे तपासून शासनाने निर्णय घेतला पाहिजे. मात्र आम्ही कालही, आजही आणि उद्याही रुग्णसेवेत सतत कार्यरत राहून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने प्रत्येक परिचारिका काम करत राहील असे आंधळे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

नागरिकांची बेफिकीरी भोवली ब्रिटन, फ्रान्समध्ये पुन्हा कोरोना

या कँडल मार्चमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, परिचारक, इतर सेवक सहभागी झाले होते. यामध्ये विशेष करून परिचारिकांचा समावेश मोठ्या संख्येने होता. या सर्वांनी या झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिचारिका संघटनेच्या आंधळे यांच्यासह डॉ.प्रसाद सायगांवकऱ़ व अन्य डॉक्टर्स,कर्मचारी उपस्थित होते. यापुढेही जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक परिचारिका या रुग्णसेवेत कार्यरत असतील मात्र शासनाने अन्याय करू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नेप्ती उपबाजार समितीत लाल कांद्याच्या भावात घसरण... 

Post a Comment

Previous Post Next Post