। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर । नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांदा स्थिरावला आहे. लाल कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. गावरान कांदा 2800 प्रतिक्विंटल दराने तर लाल कांदा 2400 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.नेप्ती उपबाजारात समितात सोमवारी सुमारे 48 हजार 516 गावरान कांदा गोण्यांची आवक झाली. गावरान कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2800 रुपये भाव मिळाला.
गावरान कांद्याचे प्रतिवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 2100 ते 2800 दोन नंबर कांद्याला 1600 ते 2100, तीन नंबर कांद्याला 00 ते 1600, चार नंबर कांद्याला 200 ते 800 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. एक नंबर कांद्याचे भाव स्थिर होते. मात्र दोन ते चार नंबर कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. ही वाढ शेतकर्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे. मात्र या भावावर कांदा उत्पादक समाधानी नाहीत.
लाल कांद्याच्या 24 हजार 90 गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला सर्वाधिक 2400चा भाव मिळाला.लाल कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 1800 ते 2400, दोन नंबर कांदा : 1000 ते 1800 तीन नंबर कांदा : 500 ते 1000, चार नंबर कांदा : 100 ते 500.- शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.