भरदिवसा सिध्दार्थनगरमध्ये घरात घुसून रोकड पळवली

। अहमदनगर । दि.24 नोव्हेंबर । शहरातील सिद्धार्थनगर परिसरात समाज मंदिरा शेजारी असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने भरदिवसा पिशवीत ठेवलेली 40 हजार रुपयांचे रोकड पळवून नेल्याची घटना घडली आहे.

हे देखील वाचा...खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा : उपमुख्यमंत्री

ही घटना मंगळवारी (दि.23) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत लक्ष्मीबाई सदाशिव बोरगे (वय 68, रा.सिद्धार्थनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

हे देखील वाचा...प्रभाग क्र.9 साठी 21 डिसेंबरला पोटनिवडणुक

मंगळवारी दुपारच्या सुमारस फिर्यादी बोरगे व त्यांची बहिण या दोघी त्यांच्या घरात गप्पा मारत बसलेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत पिशवीत ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड पळवून नेली. 

हे देखील वाचा...महिलेचा खून करून गटारीच्या टाकीत टाकला मृतदेह

ही चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा...५ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ 

Post a Comment

Previous Post Next Post