महिलेचा खून करून गटारीच्या टाकीत टाकला मृतदेह

। अहमदनगर । दि.24 नोव्हेंबर । नगर जिल्ह्याची वाटचाल ही गुन्हेगारीकडे वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशी एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

एका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावाच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक विडी कामगारांच्या वसाहती जवळ असलेल्या एका सेफ्टीक टँकमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सेफ्टीक टँकच्या बाहेर काढला. पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह या पाण्यात टाकल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे.

या अज्ञात महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मृत महिलेच्या हातावर निर्मला असे नाव आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post