विवाहितेस शिवीगाळ करुन विनयभंग, गुन्हा दाखल

 
। अहमदनगर । दि.24 नोव्हेंबर । लहान मुलांना रागवण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून 26 वर्षीय विवाहितेस शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील राहणारी 26 वर्षीय महिला तिच्या घरासमोर भांडी घासत असताना शेजारीच राहणार्‍या तिच्या सासूने तिच्या दीराच्या मुलाना तिच्या मुलांसोबत खेळतात म्हणून ओरडून रागावत होती. 

त्यावेळेस त्या विवाहितेने तुम्ही लहान मुलांना का रागवता, असे म्हटले. याचा राग येऊन तिच्या दीराने तिला शिवीगाळ केली. त्यावेळेस तिची सासू म्हणाली, तिचा माज जिरव असे म्हणताच तिच्या दीराने तिला धक्काबुक्की करून खाली पाडले व तिचे कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. 

यावेळी सासू-सासर्‍यांनी तिला सोडवण्याऐवजी विवाहितेस शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून तिचे सासु-सासरे व दीर यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post