जळगावला सव्वा कोटीचा गंडा घालून फरार झालेला आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । 180 कंपन्यांच्या केंद्र चालकांना सीएसआर फंडामधून अनुदान मिळविण्याचे आमीष दाखवून व बनावट नोंदणी पत्र देऊन तसेच नीती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून 1 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक करुन जळगाव येथून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे केली.
याबाबतची माहिती अशी की, योगिता उमेश मालवी (रा.जळगांव.) यांची अविनाश अर्जुन कळमकर (रा. देठणे गुंजाळ, ता. पारनेर) याने 180 कंपनीच्या केंद्र चालकांना सीएसआर फंडामधून अनुदान मिळविण्याचे आमीष दाखवून बनावट नोंदणी पत्र देवुन तसेच नीती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून 1 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत जळगाव येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपी अविनाश कळमकर हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा जळगांव येथील फौजदार संदीप पाटील हे गुन्हयाच्या तपासकामी अहमदनगर जिल्हयात आले होते. ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह शोध घेत असताना कटके यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की,
आरोपी कळमकर हा त्याच्या राहत्या घरी असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, पोलिस हवालदार दत्तात्रय हिंगडे, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोलिस कॉन्स्टेबल मयुर गायकवाड, प्रकाश वाघ, विजय धनेधर यांनी मिळून कळमकर यास ताब्यात घेवून आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा जळगांव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कार्यवाही आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा जळगांव करीत आहेत.
Tags:
Breaking

सव्वा कोटी घेतले पण शंभर कोटी रुपये लोकांना देणं आहे.
ReplyDelete