आज ८८९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत कितीने भर ...वाचा सविस्तर

आज ८८९ रूग्णांना डिस्चार्ज तर  

नव्या ८७१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के 


। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर ।  जिल्ह्यात आज ८८९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १८ हजार ५०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६०५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२५ आणि अँटीजेन चाचणीत २९५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०१, जामखेड १२, कर्जत ०१, नगर ग्रामीण १५, नेवासा ०५, पारनेर ४१, पाथर्डी ६०, राहुरी ०२, संगमनेर ४९, शेवगाव ०४, श्रीगोंदा ५५ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले ५६, जामखेड ०२, कर्जत १६, कोपरगाव ०२, नगर ग्रा.०८, नेवासा १८, पारनेर २३, पाथर्डी ०६,  राहाता २१, राहुरी ०८, संगमनेर ८०, शेवगाव ३१, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, अकोले ५६, कर्जत २६, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०६, नेवासा २६, पारनेर ३२, पाथर्डी २०, राहाता १५, राहुरी २०, संगमनेर ४६, शेवगाव ०७, श्रीगोंदा २२, श्रीरामपुर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ५९, जामखेड ३१, कर्जत १२, कोपरगाव २३, नगर ग्रा. २८, नेवासा २४, पारनेर १३५, पाथर्डी ८०, राहाता ४६, राहुरी ३३, संगमनेर २०९, शेवगाव ३५, श्रीगोंदा १२९, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,१८,५०५

*उपचार सुरू असलेले रूग्ण:५६०५

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६२९

*एकूण रूग्ण संख्या:३,३०,७३९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक ०९ सप्टेंबर, २०२१

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Post a Comment

Previous Post Next Post