। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट । भेंडी, गवार, कांदे, कोबी, टोमॉटो, मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर भारतातील परसबागेत दिसल्या तर नवल नाही. पण याच भाज्या एका भारतीय महिलेने अमेरिकेतील परसबागेत पिकविल्या आहेत. तेथे केवळ सहा महिने हवामान अनुकूल असते, त्याचा वापर करुन मूळच्या नगर (जेऊर बायजाबाई) च्या असलेल्या संगीता तोडमल यांनी आपली शेतीची हौस अमेरिकेतही जपली आहे.
जेऊर बायजाबाई या गावच्या मुळ रहिवासी असलेल्या संगीता तोडमल विवाहानंतर अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्या रहात असलेले राज्य डोंगराळ आहे. त्यांचे वडील शंकरराव तोडमल हे शेतकरी. त्यांची ही आवड मुलीनेही जोपासली आहे. त्यांनी आपल्या परसबागेत भारतीय भाज्या पिकविण्याचा तसेच घराभोवतालच्या जागेत त्यांनी विविध प्रकारच्या ङ्गळभाज्या लावल्या आहेत.
भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू आहेत. अमेरिकेत 6 महिने उन्हाळा आणि 6 महिने हिवाळा असतो. त्यावर उपाय म्हणून ते वेळापत्रक तयार केले आहे. हिवाळा संपण्याआधी त्या घरातील कुंडीमध्ये रोपे लावतात. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला थंडी कमी झाली की रोपांना काढून त्यांची ङ्गळांची लागवड करतात.
अमेरिकेत उपलब्ध झालेली बियाण्यांचा त्यांनी वापर केला आहे. तुळस, गवतीचा चहा, कोरङ्गड यांचीही लागवड केली आहे. या कामात त्यांचे पती निलेश इंगुलकर त्यांना नेहमीच मदत करतात. मी अमेरिकेत सध्या पर्यावरण विषयक अभ्यास करते, त्याला जोड म्हणून येथे भारतीय शेतीचा प्रयोग करुन अमेरिकेतील पर्यावरणाशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करते, असे संगीता तोडमल यांनी आवर्जुन सांगितले.

Tags:
Ahmednagar

अभिमान आहे !!
ReplyDelete