। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट । नगर शहरामधील विनायकनगर भागामध्ये असलेल्या सौरभ कॉलनीतील आनंद क्लासिक या इमारतीत असलेले तीन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, येथील सौरभ कॉलनीतील आनंद क्लासिक इमारतीत राहणारे पाटील, मुथा, नरवडे यांच्या फ्लॅटमध्ये चोर्या झाल्या आहेत. हे तिनही कुटुंब बाहेरगावी गेले असल्यामुळे तीनही फ्लॅट बंद होते.
याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी इमारतीत घुसून या फ्लॅटच्या दवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधील सामानाची मोठ्या प्रमाणात उचकापाचक केली व विविध प्रकारचा ऐवज चोरुन नेला. फ्लॅट मालक बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला याचा माहिती मिळाली नाही.
या इमारतीमधील दरवाजाचे कुलुपे तुटलेली दिसल्याने शेजारी राहणार्या नागरिकांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस श्वानपथकासह या ठिकाणी रवाना झाले. या चोर्यामध्ये किती रुपयांचा ऐवज व काय काय चोरीले गेले याचा तपास फ्लॅट धारक परत आल्यानंतरच लागेल.
शहर व उपनगरात चोरांचा सुळसुटाळ सुटला असून दुचाकी चोरी व भुरट्या चोर्या ही आता रोजचीच बाब झाली आहे. एक प्रकारे चोरट्यांनी पोलिसांना आवाहनच दिले असून पोलिस सतर्क असूनही चोरटे चोर्या करण्यात यशस्वी होताना दितस आहे.
पोलिसांनी चोर्यांना आळा घालण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी आता शहर व उपनगरातील नागरीकांमधून होताना दिसत आहे. पोलिसांनी गस्त वाढवल्यास निश्चित चोर्यांना आळा बसेल व चोरट्यांवर पोलिसांचा दबदबा निर्माण होईल.