ट्रक चोरीचा बनाव फिर्यादीच्या आंगलट...वाचा सविस्तर काय आहे प्रकरण

ट्रक चोरीच्या खोटी फिर्याद देणार्‍या ट्रक मालकाला अटक

विमा कंपनीला फसवायला गेला अन् स्वतःच अडकला


। अहमदनगर । दि.23 ऑगस्ट । साथीदारांच्या मदतीने स्वतःची ट्रक चोरी गेल्याचा खोटा बनाव करून चोरीची खोटी फिर्याद नोंदविली. त्यानंतर कागदपत्रे तयार करून विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍याला ट्रक मालकाला पोलिसांनी अटक केली. प्रत्यक्षात त्याने ही ट्रक भंगारात विकल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.

ट्रक मालक रेहान आयुब शाह (वय 29 रा. श्रीरामपूर), गाडी खरेदी करणार्‍या इफ्तेकार उर्फ इत्तू इस्माइल शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे हा फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहे. आठवड्यापूर्वी श्रीरामपूर येथील रेहान शाह याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली.

शाह याच्या मालकीची ट्रक श्रीरामपूर येथील स्टील कंपनीमधून अज्ञात चोरट्याची चोरून नेल्याची फिर्याद नोंदविली होती. सुमारे सहा लाख रुपयांची ट्रक चोरीला गेली होती. श्रीरामपूर शहर परिसरामध्ये ट्रक चोरीचे गुन्हे घडलेले असल्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपास करण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्यात शाह याने काही वर्षांपूर्वी घेतलेला हा ट्रक कोणतेही कागत्रपत्र न करता भंगारात विकल्याचे माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याने खोटा गुन्हा दाखल केला होता. तसेच विमा कंपनीकडून वाहनच्या विम्याचे पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने ते कागदपत्र तयार करत होता.

त्यासाठी त्याला पोलिसांकडून काही कागदपत्रे हवे होते. त्यासाठी तो पोलिस ठाण्यात जात होता. ट्रक मालका शाह याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. तो चौकशीत उडवाउडवीचे उत्तरे देत होता.

जास्त चौकशी केल्यानंतर मात्र खरी माहिती दिली. विम्याची रक्कम मिळण्यासाठी दोघांना मदतीने हे केल्याचे त्याने कबूल केले आहे. त्यातील एकाला ताब्यात घेऊन विक्री केलेला ट्रकही जप्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post