पोलिसांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी

। अहमदनगर । दि.23 ऑगस्ट ।  राहाता येथील धन्वंतरी महिला नागरी पतसंस्थेतर्फे रक्षाबंधन राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे आणि पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेच्या चेअरमन नगरसेविका डॉ. मंगलाताई गाडेकर बोलताना म्हणाल्या, गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या काळात सामाजिक अंतर, मास्कची तपासणी, लॉकडाऊनचे कडक निर्बंध

या सर्व जबाबदारी संभाळत कुटुंबाची परवा न करता चोवीस तास ड्युटी बजावत असलेल्या पोलीस रुपी भावाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी खर्‍या अर्थाने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करत आहोत.

यावेळी पतसंस्थेच्या संचालिका छायाताई निसळ,उपाध्यक्ष उषा दंडवते, सुवर्णा कोल्हे, मंगल करमासे, जागृती शिरसाठ, संगीता नारळे, आशा गाडेकर, डॉ.गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर, व्यवस्थापक संतोष माळवदे, सचिन मेहेत्रे, अविनाश त्रिभुवन, गणेश म्हसे, प्रशांत कोळगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post