संभाजी ब्रिगेडची विक्रमगड तालुका कार्यकारिणी जाहीर

 

मुंबई, (दि.19 नोव्हेंबर) : गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी विक्रमगड तालुका कार्यकारणी निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजसदादा भोईर आणि लोकसभा अध्यक्ष संजयजी पाटील यांच्या हस्ते खालील निवडी करण्यात आल्या.  


पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री.महेंद्र सातपुते, विक्रमगड तालुकाध्यक्ष शिवश्री.प्रकाश भोये, विक्रमगड तालुका सचिव, शिवश्री.देविदास चौरे, विक्रमगड तालुका उपाध्यक्ष, शिवश्री.अजय सांबरे, विक्रमगड तालुका प्रसिद्धी प्रमुख, शिवश्री.अजय लहारे, विक्रमगड तालुका संघटक, शिवश्री.रवि दाभाडे, विक्रमगड तालुका संघटक, शिवश्री.दिपक सापटा आदी.


तालुकाध्यक्ष पदावर शिवश्री.प्रकाश भोये यांची निवड केल्यामुळे विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेने आनंद व्यक्त केला. कारण विक्रमगड तालुक्यात एकाही राजकीय पक्षाने तालुक्यातील 67% असलेल्या आदिवासी समाजातील तरूणांना तालुकाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी दिलेली नाही. 

 

हे फक्त संभाजी ब्रिगेड मध्येच होऊ शकते कारण, संभाजी ब्रिगेडला शेतकर्‍याच्या व कष्टकर्‍यांच्या पोरांच्या हातात नेतृत्व द्यायचे आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post