बेपत्ता सार्थकच्या कुटुंबियांची चिंता वाढली ;
कुंटुबियांसह माळीवाड्यातील नागरीकांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट
नगर, (दि.19 नोव्हेंबर) : नगरच्या माळीवाडा भागातील गोंधळेगल्ली येथून बेपत्ता झालेला सार्थक किरण पठारे (बाल्या) या मुलाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने माळीवाड्यातील नागरीकांची चिंता वाढली आहे. यातुन बुधवारी माळीवाड्यातील नागरीकांनी पोलिस अधिक्षक पाटील यांची भेट घेऊन माहिती दिली.
दि. 13 नोव्हेंबर रोजी घराजवळून गोंधळे गल्ली, बंगालचौकी, माळीवाडा जवळुन सार्थक बेपत्ता झालेला असुन अद्यापही तो सापडला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुलाच्या घरच्यांसमवेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची हकीकत सांगितली. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम, नगरसेवक दत्ता कावरे, मुलाचे कुटुंबिय उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मुलाचा शोध लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले.
