ब्राह्मणी येथील नादुरुस्त रोहित्र बदलून वीजपुरवठा केला सुरळीत
नगर, (दि.19 नोव्हेंबर) : राहुरी तालुक्यातील 33/11 के.व्ही. ब्राह्मणी उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेचे पॉवर रोहित्र दि. 13 नोव्हेंबर रोजी नादुरुस्त झाल्याने ऐन दिवाळीत वीजग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली होती.
परंतू, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्वरीत पावले उचलून महावितरणच्या वरीष्ठ अधिका-यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार दोनच दिवसात दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अगदी विक्रमी वेळेत नादुरुस्त पॉवर रोहित्र बदलण्यात आले व मोकळओहोळ, चेडगाव व ब्राह्मणी या गावांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यानच्या काळात महावितरणच्या स्थानिक प्रशासनाने राज्यमंत्री तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून वीजपुरवठा अखंडीत ठेवून नादुरुस्त पॉवर रोहित्राची झळ बसू दिली नाही.
