विघ्नहर्ता लवकरच कोरोनाचे संकट दूर करेल : अ‍ॅड.अभय आगरकर

श्री विशाल गणेश मंदिरात आरती करुन भाविकांसाठी मंदिर उघडले


नगर, (दि.19 नोव्हेंबर) : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले मंदिरे शासनाच्या आदेशानुसार  सोमवारी उघडण्यात आली. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरही आज भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. प्रारंभी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगकर हस्ते आरती करुन भाविकांना प्रवेश देण्यात आला. 

 

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज,  उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त विजय कोथीबीरे, पांडुरंग नन्नवरे,  हरिचंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, रंगनाथ फुलसुंदर, गजानन ससाणे आदी उपस्थित होते.


याप्रसंगी अध्यक्ष अभय आगरकर म्हणाले, गेल्या आठ महिन्यांपासून सरकारच्या आदेशाप्रमाणे भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आली होती. आता शासनाच्या आदेशानुसार ही मंदिरे उघडण्यात आली आहे. श्री विशाल गणेश मंदिरही भाविकासाठी उघडण्यात आले आहे. तत्पूर्वी मंदिराचे सर्वत्र सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. 

 

भाविकांना मंदिरात येतांना सोशल डिस्टसिंग व मास्क बंधनकारक असून, मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक दिवसांपासून मंदिरे बंद होते. शासनाने ती खुली करावी, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु होते. आता मंदिरे खुली झाले आहेत. लवकरच विघ्नहर्ता कोरोनाचे संकट दूर करेल, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.


मंदिर ट्रस्टच्यावतीने भाविकांना प्रवेश देतांना काळजी घेण्यात येणार आहे, तशी व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post