‘केडगाव फटाका’ची लकी ड्रॉ सोडत

नगर, (दि.19 नोव्हेंबर) : केडगाव येथील केडगाव फटाका असोसिएशनच्या वतीने 1100 रुपयांच्यावर फटाके खरेदी करणार्‍या नागरिकांना एक लकी ड्रॉ चे कूपन देण्यात आले होते. दिवाळीनंतर या लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात आली. यात प्रथम विजेता दगडू दरेकर यांना वर्धमान होम्सच्या वतीने 32 इंच एलईडी डी टीव्ही, दुसरे विजेता शिवाजी हुलावले यांना न्यू सचिन ज्वेलर्सच्या वतीने फ्रीज, तिसरे विजेता यांना जगदंबा बिल्डरच्या वतीने पाच हजार रुपये रोख, चौथा विजेता शुभम मोरे यांना मोबाईल, पाचवे विजेते संदीप बाबूजी व सहावे विजेते राजकुमार ढुमणे यांना मिक्सर देण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राम मुलतानी, गजेंद्र राशिनकर, अतुल शिंगवी, राजेंद्र कुलथे, विठ्ठल कोतकर, यश भंडारी आदी उपस्थित होते. 

 

यावेळी केडगाव फटाका असोसिएशनचे अध्यक्ष रमेश परतानी, उपाध्यक्ष किरण गुंड, सेक्रेटरी राजेंद्र सातपुते, खजिनदार संतोष फसले, एकनाथ कोतकर, शुभम रासकर, रमेश कोतकर, हरिदास घुले, जाकिर मनियार, अजय श्रीमाळ, संतोष गुंडे, शैलेश परतानी, विनायक काळे, अक्षय रोहोकले, अक्षय मतकर, आकाश लोंढे, फिरोज शेख, प्रदीप नन्नवरे, गोरख गारुडकर, किरण ठुबे, गोरख कारले, सलीम शेख, सागर जाधव, इस्माईल शेख, निलेश राऊत, राजेश सातपुते आदी उपस्थित होते.


याप्रसंगी अध्यक्ष परतानी म्हणाले, केडगावातील फटाका व्यापार्‍यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली असून संघटनेला आज तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. संघटना स्थापन केल्याने सर्वांना या संघटनेमार्फत उत्तम प्रकारे फटाक्यांचा व्यवसाय करता येत आहे. सर्वांची दिवाळीत व्यवसाय करण्याची चिंता आता दूर झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post