नगर, (दि.19 नोव्हेंबर) :कोंबड्या नेण्यासाठी आलेली वाहने का अडवली, असा जाब विचारला असता लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री नेवासे तालुक्यातील वाकडी शिवारात घडला. या प्रकरणी पोलिसांनी नारायण एकनाथ कुलट, गणेश नारायण कुलट, अमोल नारायण कुलट, नरेंद्र रामनाथ पवार व पूनमचंद श्यामराव लष्करे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
दत्तात्रय बबन काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, कोंबड्या नेण्याकरिता तीन वाहने आली असता नारायण कुलट, गणेश कुलट, अमोल कुलट व गावातील नरेंद्र पवार, पूनमचंद लष्करे यांनी तुमच्या कुक्कुटपालनाचा आम्हास त्रास होत आहे, असे म्हणत लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली
Tags:
Ahmednagar
