आमदार रोहित पवारांचा अपघातग्रस्तांना मदतीचा हात


सांगली, (दि.19 नोव्हेंबर ) : रोहित पवार हे माण तालुक्यातील मांडवे - पिंगळी येथेून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला एका शेतकर्‍याच्या ओमनी कारला अपघात झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने ही ओमनी कार खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली. तसेच यामध्ये जमखींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयाकडे जाण्याची व्यवस्था केली.


राष्ट्रवादीचे कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले. अपघात झाल्यामुळे रस्त्याच्याकडेला खड्ड्यात गेलेली ओमनी कार रोहित पवार यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून खड्ड्यात गेलेल्या या ओमनी कारला धक्का मारत बाहेर काढण्यास मदत केली.


एवढेच करुन ते थांबले नाही तर त्यांनी तात्काळ अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळू शकले. रोहित पवार यांनी त्यानंतर ट्विट करून या अपघाताची माहिती देतानाच अशा अपघाताच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहनही केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post