नाशिक, (दि.19 नोव्हेंबर) : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
नाशिक परिमंडळाचे कार्यकारी अभियंता धनंजय आहेर यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिकपणे राष्टीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत चव्हाण, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य व शामकांत आहेर, उपव्यवस्थापक सदू जाधव व सुधा बाजपेयी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
Maharashtra
