नगर, (दि.24 नोव्हेंबर) : नगर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डीले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे तर स्वागताध्यक्षपदी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे उपस्थित होते.
यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, चेअरमन सुंबे साहेब, माजी सभापती विलास शिंदे, हरिभाऊ कर्डीले, वाय.डी. कोल्हे, दिलीप भालसिंग, बाबासाहेब ख्रसे, रेवननाथ चोभे, बबन आव्हाड, बाळासाहेब निमसे, छत्रपती बोरुडे, बन्सी कराळे, उद्धव कांबळे, शिवाजी कार्ले, पवार सर, सुनील कोठुळे, बाळासाहेब महाडिक, रमेश पिंपळे, अर्चनाताई चौधरी, रेश्माताई चाबुकस्वार इतर भाजपचे जिल्हा पदाधिकारी, नगर तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन दिवसांमध्ये अनेक वक्ते विविध विषयांवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, पहिल्या दिवशी पक्षाची कार्यपद्धती व संघटात्मक रचनेतील भूमिका दिलीप भालसिंग यांनी मांडली. तर पक्षामार्फत मागील सहा वर्षांपासून अंत्योदय योजनेसंबंधी काय प्रयत्न केले गेले याचे सविस्तर मार्गदर्शन नितीन उदमले यांनी केले.
राज्यातील सध्याची राजकीय पार्श्वभूमी व सद्यपरस्थितीवर पक्षाची भूमिका राहुल जामदार यांनी मांडली तर आत्मनिर्भर भारत विषयाची संकल्पना अनिल लांडगे यांनी मांडली व भारताची वैचारिक मुख्यधारा व आपली विचार धारा या बद्दलची भूमिका बाळासाहेब महाडिक यांनी मांडली. शिबिराच्या दुसर्या दिवशी सुभाष गायकवाड, दादाराव ढवण, अमजद पठाण, अंतु वारुळे हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून शिबिराचा समारोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले व माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या हस्ते होणार आहे.