नगर, (दि.24 नोव्हेंबर) : शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. तर दोन तरूणीची सुटका केली. अवैध धंद्यावर पोलिसांनी आता छाडसत्र सुरु केले आहे. यातुन अवैध धंद्यावाल्यांचे धाबे चांगलेच दणानले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, येथील एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगावातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकुन येथील दोन तरूणीची सुटका करत या ठिकाणावरुन एकाला अटक केली आहे.
तसेच या छाप्याची चाहुल लागताच येथील दोघे पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजचा मालक सिद्धेश्वर कटके, प्रमोद शिवाजी त्रिंब्यके (रा. मार्केटयार्ड, नगर) व सुधीर भालेराव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलीस नाईक परशुराम नाकाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी प्रमोद त्रिंब्यके याला अटक केली आहे. बोल्हेगावातील गणपती चौकात सिद्धेश्वर कटके याच्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. यावरुन उपअधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. बोरसे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक पाठक व कर्मचारी यांनी कटके याच्या लॉजवर छापा टाकला.
यावेळी प्रमोद त्रिंब्यके मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. तर दोन तरूणीची सुटका केली. छापा पडताच लॉजचा मालक कटके व भालेराव पसार झाले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
