नगर, (दि.05 ऑक्टोबर) : शहर व परिसरात जिल्हयातील विविध दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरीच्या 25 दुचाक्यांसह चौघांना जेरबंद केले आहे.
माहिती अशी की, जिल्हयाभरात दुचाकीचोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. दुचाकी चोरीच्या तपासाए दरम्यान, जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून पकडण्यात आलेल्या आरोपींकडून विविध कंपन्यांच्या 25 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कोतवाली पोलिसांनी कारवाई केली असून हस्तगत दुचाकीमध्ये कोणाच्या असल्यास त्यांनी पोना गणेश धोत्रे (मो.9967913069) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली चे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे सपोनि नितीन रणदिवे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहिद शेख, पोकॉ बापूसाहेब गोरे, भारत इंगळे, प्रमोद लहारे, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अनेक दुचाकीवरील क्रमांक बदलण्यात आले असून, गाडी चोरीस गेलेल्या नागरिकांनी आपली वाहने ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.
