समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संत रविदास महाराजांच्या विचारांनी कार्य करण्याची गरज : आ. निलेश लंके

शिंगवे नाईकला चर्मकार विकास संघाच्या शाखेचे उद्घाटन

आमदार आपल्या दारी उपक्रमाद्वारे 

लाभार्थींनी शासकीय योजनेसाठी भरले अर्ज


नगर, (दि.05 ऑक्टोबर) :  शिंगवे नाईक (ता. नगर) येथे चर्मकार विकास संघाच्या शाखेचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. तर आमदार आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थींचे विविध शासकीय योजनेसाठी फॉर्म भरुन घेण्यात आले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सामाजिक कार्यकर्त्या मिरा शिंदे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, रविश्री गाडे महाराज उपस्थित होते.


उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोहिदास नगर फलकाचे अनावरण करण्यात आले. शाखेच्या नवनियुक्त पदधिकारी यांना संत रविदास महाराजांची प्रतिमा व नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचा लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी जागेवर फार्म भरुन कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली.


यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा शहराध्यक्ष बलराज गायकवाड, गटई अध्यक्ष संतोष कांबळे, अमर झिंझोर्डे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद सय्यद, कार्याध्यक्ष महेंद्र कोळपकर, स्वप्निल धामणे, मुस्ताक सय्यद, मुन्ना सय्यद, देविदास सुरसे, ज्ञानेश्‍वर डोळस, बाप्पू डोळस, विलास तूपे, अनिकेत डोळस, सागर डोळस, सुहास पाखरे, विकास तुपे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


आमदार निलेश लंके म्हणाले की, समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संत रविदास महाराजांच्या विचारांनी कार्य करण्याची गरज आहे. चर्मकार समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. तर संजीव गांधी निराधार योजनेसाठी किमान 22 हजार रुपये उत्पन्नाची अट वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


संजय खामकर यांनी समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्मकार विकास संघ प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजूंना संघटनेच्या वतीने आधार देण्यात आला. समाजातील दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी संघटनेचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले.


मिरा शिंदे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागूल यांनी केले. प्रास्ताविकात सुहास पाखरे यांनी चर्मकार विकास संघाच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. आभार युवा जिल्हा सचिव अमोल डोळस व युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप डोळस यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post