। अहिल्यानगर । दि.24 जुन 2026 । रयत शिक्षण संस्थेच्या स्कूल कमिटीवर सुप्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्ते ॲड. रवींद्र प्रल्हादराव शितोळे यांची निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडके साहेब यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे.
ॲड. शितोळे हे अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. तसेच देशभक्त परमपूज्य रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीचे सचिव व विश्वस्त असून शहराच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास जडणघडणीसाठी उपयुक्त बालसंस्कार वर्ग व असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल चे माजी अध्यक्ष व झोन चेअरमन असताना कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांना मोफत औषधोपचार केलेले आहेत .बालपणापासून राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून राष्ट्र सेवा दल सैनिक म्हणून शहर पातळीवर राज्य व देश पातळीवर विविध पदांवर यशस्वीरित्या कार्यरत राहून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
पुणे येथील एस एम जोशी मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विविध संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतानाच अनाथ आश्रम व विविध शैक्षणिक संस्थांना सढळ हाताने मदत व सहकार्य करीत आहेत. ॲड. शितोळे यांच्या आज पर्यंतच्या कार्याची दखल घेऊन त्यांची रयतच्या शाळा समितीवर सदस्य म्हणून निवड ही अभिमानाची गोष्ट आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा निश्चितच लाभ होईल. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ. रोहित पवार मा. उत्तर विभागीय अध्यक्ष मा. आ. दादाभाऊ कळमकर उपाध्यक्ष अरुण कडू जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस सचिव विकास देशमुख जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी अभिनंदन केले .
