अमृतलिंग तलाव सांडवा भिंत पाडून नुकसानीचा प्रयत्न : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

 

नगर - जामखेड, (दि.05 ऑक्टोबर) : तालुक्यातील खर्डा येथील अमृतलिंग लघुपाटबंधारे तलावाची सांडवा  भिंत  अज्ञात व्यक्तीने पाडल्यामुळे जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत माहिती अशी की खर्डा व नागोबाचीवाडी या क्षेत्रामध्ये अमृतलिंग लघुपाटबंधारे विभाग असलेल्या तलावाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले.


त्यामुळे तलाव 60 टक्के भरला आहे. अमृतसिंग तलावामुळे खर्डा व नागोबाचिवाडी येथील 260 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे परिसरातील शेतकर्‍यांनी पाइपलाइनद्वारे शेतात पाणी नेऊन शेती पिकण्यास सुरवात केली.


परंतु  अज्ञात व्यक्तीने सांडवा भिंतीला भगदाड पाडून तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकर्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.अमृतलिंग तलावाच्या सांडव्याची भिंत पडून नुकसान केले.  लघु पाटबंधारे विभागाने अज्ञात इसमाने नुकसान केली म्हणून जामखेड पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.


सांडव्याची भिंत पाडल्याची माहिती कळताच लघु पाटबंधारे शाखा अभियंता रामभाऊ ढेपे, खर्डा सरपंच संजय गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, रामचंद्र गोपाळघरे रामा गोपाळघरे बाजीराव गोपाळघरे सह ग्रामस्थांनी अमृतसिंग तलावास भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post