राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यू आढळून आल्यानंतर पोल्ट्री व्यवसाय संकटात आल्याचे चित्र होते. बर्ड फ्ल्यू च्या प्रादुर्भावामुळे नागरिका चिकन खाण्याविषयी कचरत होते. त्यांच्या मनात असणाऱ्या भीतीमुळे या व्यवसायावरही परिणाम होऊन शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र, अशा अफवा आणि गैरसमज दूर कऱण्यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेल्या पुढाकाराला डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन शेळके, पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. देविदास शेळके, डॉ. उमाकांत शिंदे, शिवाजी शिंदे, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, संतोष कानडे, दीपक गोलक, दत्तात्रय सोनटक्के, कानिफ कोल्हे, डॉ. कुकडे, अनिल झारेकर, विठ्ठल जाधव, गोरख शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
केवळ गैरसमज आणि अफवा यामुळे हा व्यवसाय अडचणीत येऊ नये, शेतीपूरक व्यवसायात पशूधनानंतर कुक्कुटपालनात जिल्हा आघाडीवर आहे, त्याची घडी बिघडू नये, यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेला पुढाकार आणि त्याला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद ठरला.