वारली चित्रातून रंगविल्या अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू

अहमदनगर शहराच्या वाढदिवसानिमित्त 
हर्षदा डोळसे यांचा उपक्रम
 

नगर, (दि.30) : अहमदनगर शहराच्या ५३० वा वाढदिवसानिमित्त हर्षदा अशोक डोळसे यांनी चित्र शैलीतच संपूर्ण नगर शहराचा व ऐतिहासिक वारसा रंगविला आहे. १८ बाय ३६ इंच मापाच्या कॅनव्हसवर भुईकोट किल्ला, दिल्लीगेट, बागरोजा,  ह्युम मेमोरिअल चर्च, चाँदबिबी महल, फराहबक्ष महल, आनंदधाम, चौथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, सुंदर दत्त मंदिर, रेल्वे स्टेशन, लोखंडी पुल, मांजर सुंबा, बेहस्त बाग, रणगाडा संग्रहालय, दमडी मस्ज़िद, विशाल गणपती अशा २३ वास्तू एकाच चित्रात रेखाटल्या आहे.

सीना नदीच्या तीरावर वसलेले हे सुंदर शहर सर्व बाजूंनी डोंगर रांगानी वेढलेले दर्शविले आहे. वाहती सीना नदी तिच्यातील जीवसंपदा, नदी किनारी असलेला कलात्मक झाडी, झुडपे, नदीवरील ऐतिहासिक लोखंडी पूल यामुळे चित्रात जीवंतपणाचा आभास होतो. उंच डोंगरारील चाँदबीबी महल, मीरावली पहाड, डोंगरातील पवनचक्क्या यामुळे चित्राची भव्यता जाणवते. प्रत्येक वास्तूजवळ आवश्यतेनुसार गतीमान वारली चित्राच्या वैशिष्ट्यपुर्ण व्यक्ती, प्राणी, पक्षी, वाहने रंगविली आहेत. उत्सव साजरा करणारे छोटेसे व्यासपीठ आणि रसिक नगरकर रंगविले आहेत. दमडी मस्ज़िद, ऐतिहासक वस्तू संग्रहालय, बुर्‍हाणनगरचे देवी मंदिर आदि वास्तू त्रिमितीय आभास दर्शवणार्‍या रेखाटल्या असून ही त्या या चित्रातीलच एक भाग असल्याचे दिसते. या छोट्या कॅनव्हसवर टेराकोटा रंगाच्या गडद पार्श्‍वभूमीवर अत्यंत रेखीव आणि नैसर्गिकता जपत पांढर्‍या रंगाने हे चित्र रंगविले आहे.

हर्षदा डोळसे या अनेक वर्षांपासून वारली मधुबनी या चित्र शैलीत चित्र निमिर्ती करीत असून, त्यांच्या या चित्रांची समुह प्रदर्शने देखील झाली आहेत. या लोकचित्र शैलीत आधुनिक, धार्मिक आणि दैनंदिन विषयांची मांडली अत्यंत सुंदर करीत आहे. वारली चित्रांच्या सहाय्याने संपूर्ण रामायन त्यांनी रंगविली आहे. राम जन्मापासून ते सिता स्वयंवर, वनवास, जटायु वध, रावनाशी युद्ध इत्यादी प्रसंग एकाच चित्रा रंगविली आहेत. कोकणातील जीवन या चित्र पद्धतीत रंगवितांना समुद्र, समुद्राकिनारची जहाजे, झाडे, मासेमारी, इ. विषय एकाच चित्रा दर्शविले आहेत. या वारली चित्र शैली चित्र सोबत विविध शोेभेच्या वस्तू, पॉट, कपडे, लॅम्प आदिंवर त्यांनी उपयोग केलेला आहे.

या चित्र शैलीचा प्रसार-प्रचार व्हावा, म्हणून अनेक वारली चित्र कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अगदी ६ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सोपी चित्र शैली शिकविली आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पद्धतीने, विविध महिला फेसबुक ग्रुपवर लाईव्ह प्रात्याक्षिकांच्या सहाय्याने ही चित्रकला रसिकापर्यंत पोहचविली आहे. हे नगर शहराचे ऐतिहासिक वारसा एकत्रित दर्शविणारे चित्र, संपूर्ण रामायण आणि इतर चित्रं पाहण्यासाठी लॉकडाऊननंतर अहमदनगरच्या सावेडी येथील अशोका आर्ट गॅलरीत असणार आहेत, असे सौ.डोळसे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post