जि.प.लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार लाभ

संघटनेतर्फे प्रशासनाचे आभार ।
 एक जून पासूनचे लेखणी बंद आंदोलन स्थगित
 

नगर, (दि.30) : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार लाभ मिळण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. कर्मचार्‍यांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले असून उर्वरित कर्मचार्‍यांच्या त्रुटी दूर करून आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परिचर संवर्गाच्या 10 वर्ष झालेल्या कर्मचार्‍यांनाही लिपिकाची वेतनश्रेणी देण्याचा निर्णय लवकरच होईल, अशी ग्वाही जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दि. 26 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंकी यांची भेट घेऊन लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे सातवे वेतन आयोगानुसार लाभ मंजुर केल्याबद्दल आभार मानले. तसेच उर्वरीत राहीलेल्या कर्मचार्‍यांचे त्रुटी संबधीतांना कळूवन लवकरात लवकर कर्मचार्‍यांचे आदेश निर्गमीत करणेबाबत चर्चा केली. परिचर संवर्गातील 10 वर्षे झालेल्या कर्मचार्‍यांना 1 जुलै 2011 चे शासन निर्णयानुसार लिपीकांची वेतनश्रणी 1900 ग्रेड पे देणेसंदर्भात चर्चा करण्यात आली.

सोळंकी यांनी पुढील आठ दिवसात उर्वरीत कर्मचार्‍यांचे आदेश निर्गमीत करणार असून परिचर संवर्गातील कर्मचार्‍यांना 1 जुलै 2011 चे शासन निर्णयानुसार लाभ देण्याबाबत सर्व शासननिर्णयांचे अवलोकन करुन त्याबाबत निर्णय देखील लवकरच दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे संघटनेने दिनांक 1 जुन 2020 पासून पुकारलेले लेखणी बंद आंदोलन तुर्त स्थगीत करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर यांनी सांगितले.

यावेळी सोळंकी यांच्यासह कक्ष अधिकारी भिटे, कार्यालयीन अधीक्षक राऊत, वाघ, वरिष्ठ सहायक अमोल दिवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, सचिव विकी दिवे, शिवहरी दराडे, संदिप मुखेकर, कल्याण मुटकुळे, सुधिर खेडकर,भरत घुगे, संजय कडुस, पंडीत, प्रविण कुर्‍हे ,कृष्णा वारे, धैर्यशंभो सोलट, चेतन चव्हाण, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post