आज नगर शहरात पाच तर संगमनेरमध्ये दोन बाधित रुग्ण
सथ्था कॉलनी परिसर सील
कंटेन्मेंट झोनसाठी हालचाली सुरु
नगर, (दि.30) : शहरात आज (शनिवारी) एकाच कुटुंबातील पाचजण कोरोनाबाधित आढळून आले आहे. सथ्था कॉलनीत राहणारे हे कुटुंब असून, रुग्णांमध्ये एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. नगर शहरातील पाच जण व संगमनेरमध्ये दोन असे एकूण सात रुग्ण आज जिल्हयात आढळून आले आहे. एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती बाधित आढळल्याने मनपा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाला असून सथ्था कॉलनी परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
सथ्था कोलनी येथील या कुटुंबातील एका व्यक्तीचा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासगी प्रयोग शाळेने त्यांना कोरानाची लागण झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सथ्था कॉलनी येथील या व्यक्तीच्या संपर्कातील 13 जणांची नगरमध्ये तपासणी केली. यात 13 पैकी 5 व्यक्तींचा करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, उपचार घेत असलेली व्यक्ती व शहरातील पाच व्यक्ती असे एकुण सहा रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे. मनपा प्रशासानाने सथ्था कॉलनी सील केले आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील आज सकाळी दोन जण कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्हयात आज सात कोरोनाबाधित आढळून आले असून नगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे.

Tags:
Ahmednagar