प्रा.राम शिंदे यांची वर्णी लागणार
छत्रपतीच्या वंशजा बरोबर होळकरांच्या वंशजांचेही पुर्नवसन
छत्रपतीच्या वंशजा बरोबर होळकरांच्या वंशजांचेही पुर्नवसन
नगर (दि.22) : एप्रिल 2020 अखेर राज्यामधून राज्यसभेच्या 3 जागांसाठी तसेच विधानपरिषदेच्या 4 रिक्त जागांवर भारतीय जनता पार्टीच्या विस्थापित नेत्यांचे पुर्णवसन होणार आहे. यामध्ये राज्यसभेसाठी यापुर्वी संजय काकडे, रामदास आठवले, अमर साबळे, प्रकाश जावडेकर, डॉ.विकास महात्मे या दिग्गजांची राज्यसभेवर निवड झाली होती. यापैकी समाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, संजय काकडे, अमर साबळे या तीन राज्यसभा सदस्यांची मुदत संपणार आहे. या तीन जागांवर प्राधान्यांने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे वंशज माजी मंत्री, राम शिंदे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी सांगितली.
दरम्यान, राम शिंदे यांनी नुकत्याच जामखेड येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात मला दहा वर्षात मतदान संघात मतदार संघाच्या मतरुपी आशिर्वादामुळे आमदार व मंत्री होता आले.भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये 5 वर्षात तब्बल 14 हुन अधिक खाते सांभाळण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली. आगामी काळात या कामांचा अनुभव पाहता राज्यसभा अथवा विधानपरिषदेवर संधी दिल्यास संधीचे सोने करु असे वक्तव्य केल्यामुळे या घडामोडींना वेग आला आहे.
एप्रिलमध्ये विधानपरिषदेवर माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, या चार दिंग्गजांमध्ये स्पर्धा असून 4 जागा रिक्त होणार असल्याने विधानपरिषदेवर वर्णी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच बारामती मधुन अजित पवाराच्या विरोधात उमेदवारी केलेले गोपिचंद पडळकर हे विधानपरिषदेवर वर्णी लावण्यासाठी देवेंद्र फडणीव यांच्याकडे आग्रही असल्याने राम शिंदेंना राज्यसभेचा पर्याय देण्यात आल्याचे समजते. प्रा.शिंदे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे वंशज असल्याने इंदोर, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यामध्ये होळकरांच्या वंशजांना विशेष मान असतो पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांना राज्यसभेर घेण्यात आल्याने धनगर समाजाच्या मतांची गोळा बेरीज झाली. मात्र, आता त्यांची मुदत 2 वर्षाने संपणार असून त्यांच्या नंतर देशपातळीवर धनगर समाजाला सन्मान देण्याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने केला आहे. या संदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केल्याचे समजते. याअगोदर राज्यामधुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केेंद्राच्या मंत्रीमंडळात काम पहावे अशी इच्छा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मी राज्यात थांबतो माझ्या ऐवजी प्रा.राम शिंदे यांना केंद्रात संधी द्या अशी अटकळ घातल्याने राम शिंदे यांना राज्यासभेची लॉटरी लागण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातमून व्यक्त होत आहे.
Tags:
Maharashtra

श्री राम शिंदे हे होळकर वंशज कसे..?
ReplyDeleteकसे म्हणजे आहेतच की ते
Deleteतशी वंशावळ सादर करा फ़ालतूगिरी बंद करा
ReplyDelete