नगरमधील इंग्रजीचे हजारो पेपर पुन्हा डाकघरात
बारावी परीक्षेवर प्राध्यापकांचा बाहिष्कार कायम
बारावी परीक्षेवर प्राध्यापकांचा बाहिष्कार कायम
नगर (दि.22) : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक समितीचा बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकल्याने 12 वीचा पहिलाच झालेल्या इंग्रजीच्या उत्तरपत्रिका तपासण्या नकार दिल्याने कनिष्ठ महाविद्यालयात आलेले इंग्रजीचे पेपरचे गठ्ठे पुन्हा पोस्टात गेले. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्राध्यापकाने इंग्रजीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेण्यास नकार दिल्याने नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो इंग्रजीचे उत्तरपित्रका पुन्हा पोस्टात गेले. विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी 12 वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा नकार दिल्याने पुणे बोर्ड अडचणीत आले असून निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा दि. 18 फेबु्रवारीपासून सुरू झाली. नगर जिल्ह्यात सुमारे 67 हजार विद्यार्थीनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. इंग्रजीचा पहिला पेपर झाला. त्यानंतर इंग्रजी विषयाचे प्राध्यापकांना तपासण्यासाठी महाविद्यालयात पोस्टाने गठ्ठा दाखल झाला. मात्र विनाअनुदानित प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणार नसल्याने इंग्रजीचा उत्तरपत्रिकेचा गठ्ठा पुन्हा पोस्टमन घेवून गेले. नगर जिल्ह्यातील हजारो इंग्रजीचे उत्तरपत्रिका पोस्टात पडून आहेत.
बारावीच्या विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी जोपर्यंत विना अनुदानित प्राध्यापपकांना पगार सुरू होत नाही तोपर्यंत बोर्डाच्या सर्व कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. तसेच निवेदन शिक्षणमंत्री, पुणे बोर्ड यांना दिले आहे. महाराष्ट्रातील 43112 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान लागू करण्याचा निर्णय झाला त्या निर्णयाची अंमलबजावणी हिवाळी अधिवेशनात होणे अपेक्षित होते मात्र या अधिवेशनात कोणताही निर्णय न झाल्याने निवेदन देऊन बहिष्कार आंदोलन सुरू केले असून कोणत्याही प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक समितीने केले आहे.
Tags:
Maharashtra
