हरिश्‍चंद्र गडावर मधमाशांचा शिवक्तांवर हल्ला


हरिश्‍चंद्र गडावर मधमाशांचा शिवक्तांवर हल्ला
 
नगर (दि.22) : महाशिवरात्रीनिमित्ताने हरिश्‍चंद्र गडावर आलेल्या भाविकांवर दुपारच्या सुमारास मधमाश्यांनी हल्ला करुन जखमी केले आहे. त्यामध्ये सुमारे 70 भाविक, पर्याटक जमखी झाले आहेत. जखमींवर राजूर, कोतूळमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हजारो पर्यटक आणि भाविक महाशिवरात्रीला येथे हजेरी लावून दर्शन घेतात, मात्र, मधमाशांचा झालेला भाविकांवर हल्ल्याचा प्रकार हा हुल्लडबाजांमुळे घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाशिवरात्र असल्याने हरिश्‍चंद्र गडावर यात्रेेचे स्वरुप आले होते. वन विभाग आणि पोलिसांचा चोख बंदोतस्त असतानाही असा प्रकार घडला आहे. दुपारच्या वेळेस कोणीतरी मधमाश्यांचा पोळ्याला दगड मारला असल्याची माहिती समजली. यातुनच मधमाशांनी भाविकावर हल्ला करुन भाविकांना आणि पर्यटकांना जखमी केले आहे. मधमाशांनी हल्ला केल्याने चांगलीच पळापळ उडाली होती.

भाविकांना रुग्णालयात नेण्यासाठी तसेच प्राथमिक उपचारासाठी विजय भांगरे, उत्तम जारकड, कुलदीप डोळस, विष्णू बांडे, बाळासाहेब फाफाळे, कांताराम शिंदे, लक्ष्मण आवटे, राहुल देशमुख यांनी मदत केली. येथील डॉ.बाबासाहेब गोडसे यांच्या रुग्णालयात पाच जखमींवर उपचार करण्यात आले. तसेच 15 ते 18 रुग्णांवर राजुर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post