सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नगर (दि.19) : अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सचिव सीए राजेंद्र काळे, अॅड.शिवजित डोके, प्रसिध्द साहित्यिक संजय कळमकर, संजय पाटील सर, किशोर मरकड, डॉ.अविनाश मोरे आदीसह मराठा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तरूणांना मार्गदर्शन करतांना संजय कळमकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतांना त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे नुसत्या घोषणा देऊन उपयोग नाही. त्यांची दूरदृष्टी, राजकारण, गनिमी कावा, मावळ्यांमध्ये निर्माण केलेली जिद्द, याविषयी सखोल अभ्यास केला पाहिजे.
Tags:
Maharashtra
